प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
लवकरच तुम्ही आयुष्यातली एक अवघड परीक्षा देणार आहात. या परीक्षेतील यशापयशावर तुमच्या जीवनाची दिशा ठरणार आहे. म्हणून या परीक्षेसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
गेले वर्षभर तुम्ही खूप परिश्रम घेतलेत. सतत पुस्तकं वाचणं, नोट्स काढणं, ती जागरण, तो वेळी-अवेळी जसा जमेल तसा करून प्यायलेला चहा, मित्र मैत्रिणींशी सतत केलेली अभ्यासाची चर्चा, ज्येष्ठांचे हवे नको असलेले सल्ले, टीका व त्यामुळे येणारे टेन्शन, क्वचित आजारपण, कधीतरी अभ्यासाचा आलेला कंटाळा पण त्याच रात्री भावी आयुष्याची पडलेली गोंडस स्वप्ने व म्हणून दुसऱ्या दिवशी आलेला उत्साह, खेळ, गप्पा, TV, सिनेमा, सहली या आणि अशा अनेक आनंदांना लागलेली कात्री......
खरच खूप अवघड गेलं हे वर्ष.
आता या सर्व धडपडीचा शेवट जवळ आलाय. "याचसाठी केला होता अट्टहास " अशी ही परीक्षा लवकरच "शेवटचा दिस गोड व्हावा" म्हणत संपेलही. या वर्षात तुमच्या कुटुंबीयांनी, तुमच्या शिक्षकांनी, मित्र मैत्रिणींनी आणि हो ! Ednexa team ने पण तुमच्यासाठी खूप काही केलंय. तुम्ही देखील तुमच्या आणि या सर्वांच्या कष्टांना अंतिम रूप देण्यास उत्सुक असाल.
अशा वेळी शुभेच्छांची किंमत कळते. या शुभेच्छा जर Ednexa सारख्या, तुमच्या मदतीला सदैव तत्पर असणाऱ्या, Team कडून मिळाल्या, तर आत्मविश्वास शतगुणित होतो आणि यशाचा मार्ग सोपा वाटू लागतो. तुम्ही आणि यश यांच्यात आता फक्त एका परीक्षेचं अंतर उरलंय. ते यशस्वीरीत्या आक्रमिण्यासाठी तुम्हाला Ednexa तर्फे खूप खूप शुभेच्छा !
यशस्वी भव !
- आपटे सर.

1 Comments
My Dear Student Friends.....!
WIsh you all the best for CET exam.
Don't worry....ALL IS WELL...and this is just the beginning....!
Good Luck !
» All comments
» Comments RSS