Prof Shirish Apte's Blog

All The Best

May
09

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
        तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी C.E.T. आता खूपच जवळ आलीये. तुमच्या मनात थोडं tension, थोडी उत्सुकता  आणि चक्क थोडी सुटकेची भावना पण असणार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
        अगदी Last minute instructions म्हणाल तर थोड्याच आहेत. आणि त्यासुद्धा अभ्यासाबद्दल नाहीत. कारण आता अभ्यासाच्या सूचना द्यायची वेळ निघून गेलीये. त्यातल्या त्यात एक सूचना म्हणजे आता नवे कोणतेही MCQ सोडवू  नका. जे सोडवून झालेत तेच पुन्हा पुन्हा वाचा. बाकीच्या सूचना अभ्यासेतर आहेत.  
        पहिली गोष्ट म्हणजे C.E.T.ला जाताना पालकांबरोबरच जा. त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. ती सोय आहे. समजा center वर गेल्यावर तुम्हाला एखादी विसरलेली गोष्ट आठवली (उदा: hall ticket, pen, पाण्याची बाटली ) तर तुमचे पालक ती तुम्हाला आणून देऊ शकतात. तुम्हाला परीक्षेसाठी जे center मिळाले आहे ते जर माहितीतले नसेल तर  पालकांना ते आदल्या दिवशी प्रत्यक्ष डोळ्याने पाहून यायला सांगा. ऐनवेळी center सापडायला उशीर झाला असं व्हायला नको. जाताना बरोबर sandwich, पाण्याची बाटली, एखादं milk chocolate जवळ ठेवा. चांगलं वापरलेलं black  ball point pen with one additional refill जवळ असूद्या.
       सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं biological time table बदलू नका. ज्या वेळी नेहेमी झोपता त्याच वेळी आदल्या दिवशीपण झोपा. रात्रभर अभ्यास ( काय म्हणता बरं तुम्ही त्याला ..... हं... night मारली ) करू नका. दुसऱ्या दिवशी त्रास होतो. मी अशी उदाहरणे पहिली आहेत.
       C.E.T. ही परीक्षा तुमचं application mind check करणारी परीक्षा आहे. ती तुमची बुद्धिमापन चाचणी नव्हे. त्यात कमी मार्क्स पडले म्हणजे आपण कमी पडतो किंवा आपली क्षमता नाही असं नाही. तुम्ही technical branch साठी योग्य नाही, एवढाच त्याचा अर्थ होतो. तेव्हा मार्क्स चं टेन्शन घेऊ नका. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि मनासारखं यश मिळवा.
         यशस्वी भव!
      

Tags

Views (436) | Print | E-mail to friends | |

Post Comments

Add Your Comment!

Author

Prof Shirish Apte

Prof Shirish Apte

Member since: 09/26/09

26 posts | RSS feed

Related Posts

Popular Posts